बफेलो मराठी मित्र परिवार

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी 

Sponsors / Donors

BMMP is thankful to our generous donors.

Please click below to see list of our proud donors.

Donors

Upcoming Events

Diwali Anka 2018

 

नमस्कार मंडळी !
गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी देखील आपण आपल्या मराठी मंडळाचा दिवाळी अंक प्रकाशित करणार आहोत . या उपक्रमाला  आपला  पुन्हा  एकदा उदंड प्रतिसाद मिळेल अशी खात्री आहे. या अंकाद्वारे गेल्या वर्षी आपल्या परिवारातील अनेक सदस्यांचे सुप्त कलागुण सामोरे आले. तीच प्रथा आपण या वर्षी देखील चालू ठेवू यात . बफेलो तील मराठी परिवार लहान असला तरी जुना आणि वैविध्यपूर्ण आहे. आपल्या परिवारातील सर्वांना हा अंक वाचून आनंद मिळावा  या साठी या वर्षी आपण हा अंक खालील ३ विषयांना धरून बनवत आहोत.     १. दिवाळी आणि अन्य भारतीय सण    २. बफेलो मराठी मित्र परिवार    ३. बफेलो  शहर  आणि WNY 
आपल्याकडून खालील साहित्याची अपेक्षा आहे...  
१. साहित्य : कथा , कविता , लेख ,मुक्तछंद किंवा वेगळे अनुभव २. पाककृती : दिवाळसण पाककृती , खासकरून अमेरिकेतील जिन्नस वापरून करता तेथील अश्या सणासुदीच्या पाककृती .(१ / व्यक्ती ) ३. कला : भारतीय सणांसंबंधी कलाकृती ग्रीटिंग ,चित्रकला , रांगोळी, आकाशकंदील , पणती वगैरे ( ८"  x ११ " किंवा लहान )४. विनोद किंवा  व्यंगचित्र ५. मुलांचे साहित्य किंवा कला 
वरील सर्व साहित्य भारतीय सणवार , संस्कृती , बफेलो मधील भारतीय community संबंधी अनुभव आणि Western New York या संबंधीअसाव्यात. 
 सर्व मजकूर google चे transliteration  tool वापरून  महिन्याअखेर आमच्या कडे पोचाव्यात अशी अपेक्षा आहे.  

http://www.google.com/transliterate  या  साईटवर मराठी भाषेत टाईप करता येईल. नंतर तेMicrosoft Word मध्ये copy करून, save करून किंवाemail मध्ये copy करून आम्हांला पाठवावे. 

सर्व साहित्य स्वतःचे आणि इतरत्र न प्रकाशित झालेले असावे.  

रुपांतरित किंवा अनुवादित साहित्यावर मूळलेखकाच्या नावासह तसा उल्लेख असणे आवश्यक आहे. 

प्रत्येक कलाकृती आणि entry  बरोबर स्वतःचं संपूर्ण नाव, ई-मेलपाठवणे आवश्यक.

मुलांच्या साहित्य व्यतिरिक्त सर्व साहित्य मराठीत असावे.  

आपले साहित्य  ऑक्टोबर 3१,२०१८ च्या आत diwalianka@buffalomarathi.org या पत्यावर मिळणे आवश्यक आहे.
दिवाळी अंक २०१८ मध्ये जाहिरात किंवा शुभेच्छासंदेश देण्यासाठी पुढील व्यक्तींशी संपर्क साधावा-      रोहित ठाकूर  (551) 689-2428 (secretary@buffalomarathi.org)

आपले नम्र,
दिवाळी अंक समिती
https://buffalomarathi.org

President's Message / अध्यक्षांचे मनोगत

नमस्कार बफेलो मधील मराठी मित्रांनो

 

नमस्कार मंडळी 

गुढी पाडव्याच्या अनेक शुभेच्छा ! 

नवीन वर्ष तुम्हां सर्वांना मंगलमय आणि समाधनाचे जावो।  आजच्या शुभ दिनी मी "परिवारच्या" अध्यक्ष पदाची  सुत्रे हातात घेत आहे।  अर्थातच तुम्हा सर्वांचा स्नेह आणि विश्वास हाच माझा मोट्ठा आधार आहे। . 

आज आपण सगळ्यांनी कडु लिम्बाचि पाने खाऊन वर्ष भर निरोगी होण्याचे पाहिले पाऊल उचलले। अजुन एक विडा आम्ही, परिवाराची अध्यक्षीय समिति उचलत आहोत , आणि ते म्हणजे तुमच्या साठी दर्जेदार कार्यक्रम आणण्याचा. आजच्या आपल्या विविधरंगी कार्यक्रमानी येणाऱ्या वर्षाचा सुन्दरसा अहवालच  सदर केला जणू।  तर मंडळी ह्या आपल्या वेबसाइट वर जरा छानसा फेर फटका मारून  बघा , आणि आजच्या कार्यक्रमाची धमाल पुनः एकदा आजच्या छायाचित्रातून अनुभवा।  आज बरीच नवीन कुटुम्बे आपल्या परिवाराचा हिस्सा झाली, आणि परिवारात आनंद द्विगुणीत झाला। तर नवी आणि जूनि सगळ्या कुटुंबांना विनंती आहे की लवकरच परिवाराचे सदस्य व्हा आणि पुढच्या वेळेस तुमची कला सर्वांपर्यंत पोचवा।  सभासदत्व घेतल की असेच वारंवार भेटत राहु कारण आपली "कार्यकारी समिति" मनापासून कमला लागलिये।  खुप छान कार्यक्रमांचा वर्षाव आहे यंदाच्याही वर्षी।   आजच्या व् इतर कार्यक्रमन बद्दलचा तुमचा अभिप्राय आम्हाला द्यायला विसरु नका।

उन्हाळ्यातली सहल आठवते ना गेल्या वर्षीची ? धबधबा -  की ज्याच्या मागे अनंत - ज्योत तेवत असते।  तिथेच जाऊयात आणि मस्त मराठमोळं  जेवण फस्त करत , थोडीशी पतंगबाजी देखील करूयात।  गणपति , दिवाळी सगळे सण मिळून साजरे करूयात कारण आपल एकत्र कुटुंब आहे ना।  तर चला मंडळी विक्रम संवत २०७५ म्हणजेच २०१८ मधे एक दुसऱ्याच्या सुख दुःखांत सहभागी होऊन भारता बाहेर इथे अमेरिकेत आपला परिवार वाढवूया।  

तुमचीच विनम्र 

सुमेधा खाडिलकर

Testimonials

Deepak and Madhura Kelkar

 मराठी पाउल पढ़ते पूढे !  याचे प्रतीक म्हणजे बफेलो मराठी मित्र परिवार. खरेतर हे एक मंडळ नसून कूटुंबच आहे आणि मी या कूटुंबचा एक भाग आहे याचा मला आनंदच आहे. इतके कमी मराठी लोक असताना सुद्धा, एकत्र येवून साता समुद्रपालिकडे मराठी संस्कृति जोपासतात आणि नवीन मराठी सभासदाना आपल्या कूटुंबचा एक भाग समजतात, ह्याचा मला आनंद आहे .

Hema and Uday Dixit

We came to Buffalo in 1990,since then have been active in Marathi mandal.  We have seen the marathi community and mandal increase in strength over these years. We are happy to see young crowd and kids participating, and activites like Marathi Classes.

Yogesh and Mamta Sable

A home away from home.

We moved to Buffalo, in 2016 summer. We got introduced to this group thru' family friend. We were so glad to find libertarian people and egalitarian culture. Sometimes, its your serendipity when you meet like minded people away from home.

Shounak and Niharika Gore

साता समुद्रापार नायगरा नदीकाठी 

मायेची उब बफेलो मराठी |

दिवाळी गणपतीला जेव्हा घराची आठवण दाटी 

तेव्हा प्रेमाने जवळ घेणारी बफेलो मराठी ||

Amogh & Sujata Kango

 There are a lot of Marathi folks in Buffalo who are energetic, enthusiastic and fun loving. Some of the self motivated ones performed social  gatherings on a smaller scale earlier as well. However there was no official platform to bind all the the Marathi folks of Buffalo. I feel that Buffalo Marathi Mitra Parivar is going to be that long awaited platform to play this role and we can look forward to much more, now that the Parivar is officially forming up! 

Subscribe

Sign up to hear from us about specials, sales, and events.